SSC 10th result 2022: ऑल द बेस्ट! येथे पाहा दहावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.91 टक्के लागला आहे. यात नागूपर विभागाचा निकाल 97 टक्के आहे.यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणा-या मुलांचे प्रमाण 96.06 टक्के आहे.

या वेबसाईट्सवर पाहा निकाल

  • WWW.mahresult.nic.in
  • http://sscresult.mkcl.org
  • https://ssc.mahresults.org.in
  • www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
  • www.mahhsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

( हेही वाचा :आता 6 महिन्यांनी घेता येणार बुस्टर डोस; राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाची मंजुरी )

SSC Result 2022: असा पाहा निकाल

स्टेप-1 दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.

स्टेप-2 दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप-3 तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यत माहिती भरा.

स्टेप -4 दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here