कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत राज्यभरात संभ्रमाचे वातावरणाची निर्माण झाले होते. पण राज्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्याची माहिती समस्त विद्यार्थी व पालकांना देत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वेळापत्रक जाहीर
बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत होणार आहे. तर, बारावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान होणार आहे. दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिलपर्यंत होणार असून प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे. अशी माहिती राज्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
( हेही वाचा : ‘थर्टी फस्ट’ची मजा कोकणात घेणार आहात, तर हे वाचाच… )
परीक्षा ऑफलाईन
दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चदरम्यान आयोजित करण्याच्या दृष्टीने मंडळाने तयारी सुरू केली आहे. बोर्डाच्या परीक्षा पारंपरिक लेखी स्वरूपात म्हणजेच ऑफलाईन होतील असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community