….म्हणून दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाचा पेपर दिला नाही

सोशल मीडियावर सध्या दहावीचे एक वेळापत्रक व्हायरल झाले आहे. याच व्हायरल होणा-या वेळापत्रकामुळे अनेक विद्यार्थ्यांचा हिंदी विषयाचा पेपर बुडाल्याची माहिती मिळत आहे. SSC बोर्डाच्या वेळापत्रकात जो पेपर 8 मार्चला दाखवण्यात आला होता. तोच पेपर व्हायरल वेळापत्रकात 9 मार्चला दाखवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आणि अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला.

अन् विद्यार्थ्यांची पेपरला अनुपस्थिती

दहावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरील वेळापत्रकाचा फटका बसला आहे. या वेळापत्रकावर विश्वास ठेवून अनेक विद्यार्थ्यांची 8 मार्च ऐवजी 9 मार्चला हिंदीचा पेपर असल्याची समजूत झाली आणि त्यांचा हिंदीचा पेपर बुडाला. दहावी बोर्ड द्वितीय भाषा विषयाचा पेपर असल्याचे बोर्डाकडून नमूद केलेले आहे. मात्र, 8 मार्चला हिंदीचा पेपर असतानासुद्धा काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवला. या व्हायरल वेळापत्रकामध्ये हिंदी विषयाचा पेपर हा 9 मार्च रोजी होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी 8 मार्चला हिंदीचा पेपर जो हाॅल तिकीटवरील वेळापत्रकानुसार होता, तो न दिल्यामुळे या विद्यार्थ्यांची त्या पेपरला अनुपस्थिती लागली. 

( हेही वाचा: गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला )

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here