दहावीचा निकाल जाहीर, पण पाहता येत नाही! ५ तास साईट्स बंद! विद्यार्थी-पालक संतापले!

तब्बल ५ तास उलटले तरीही निकालाची सर्व संकेतस्थळे बंदच होती, त्यामुळे कंटाळलेल्या विद्यार्थी-पालकांनी अखेर नाद सोडून देत शिक्षण खात्याच्या ढिसाळ कारभारावर सोशल मीडियात टीकाटिप्पणी सुरु केली.

67

दहावीच्या बोर्डाने शुक्रवारी, १६ जुलै रोजी राणाभीमदेवी थाटात दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल घोषित होणार आहे, विद्यार्थ्यांनी संकेतस्थळांवर जाऊन निकाल तपासावेत, अशी घोषणा केली. मात्र विदयार्थ्यांनी जेंव्हा बोर्डाने दिलेल्या संकेतस्थळांना भेटी द्यायला सुरुवात केली, तेव्हा काही मिनिटातच सर्वच्या सर्व साईट्स बंद पडल्या. सर्वसाधारणपणे अशा प्रकारे एखादे संकेतस्थळ बंद पडले तर अधिकतर तासाभरात संबंधित संकेतस्थळ सुरु केले जाते, मात्र तब्बल ४-५ तास बोर्डाच्या साईट्स बंदच राहिल्याने वैतागलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी थेट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या ट्विटर हँडलवर सांताप व्यक्त केला.

…आणि विद्यार्थी-पालकांचा हिरमोड झाला!

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालाची घोषणा करतानाच mh-ssc.ac.in, mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र जेव्हा विद्यार्थी आणि पालकांनी एकाच वेळी या सर्व साईट्सला भेटी दिल्या, तेव्हा मात्र सर्व संकेतस्थळांचे सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे विद्यार्थी-पालकांची निराशा झाली. एका वेळी अनेक जणांनी ही वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न केला असल्याने वेबसाईट क्रॅश झाली, सध्या या साईटच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. अर्ध्या तासात ह्या साईट्स सुरु होतील, अशी माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. मात्र तब्बल ५ तास उलटले तरीही हे संकेतस्थळे बंदच होती, त्यामुळे कंटाळलेल्या विद्यार्थी-पालकांनी अखेर नाद सोडून देत शिक्षण खात्याच्या ढिसाळ कारभारावर सोशल मीडियात टीकाटिप्पणी सुरु केली.

या शब्दांत विद्यार्थी – पालकांनी व्यक्त केला संताप!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.