आजपासून दहावीची परीक्षा; विद्यार्थ्यांनो ‘या’ सूचनांचे करा पालन, नाहीतर…

152

राज्यात आजपासून म्हणजेच 2 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरु होत असून सकाळी 11 ते 2 या दरम्यान मराठीचा पेपर घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी परीक्षा देणार असून 533 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आजपासून सुरु होणा-या परीक्षेसाठी माध्यमिक बोर्डाने संपूर्ण तयारी केली आहे.

एकूण विद्यार्थीसंख्येमध्ये 8 लाख 44 हजार 16 मुले असून 7 लाख 30 हजार 62 मुले या परीक्षेला बसणार आहेत. राज्यात यंदा काॅपीमुक्त अभियान राबवले जात असून त्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा: हिंदू धर्माच्या संरक्षण आणि प्रचारासाठी आंध्रप्रदेश सरकार प्रत्येक गावात बांधणार मंदिर )

विद्यार्थ्यांनो ‘या’ नियमांचे करा पालन

  • मंडळाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवण्या, आलेख, नकाशे, लाॅग टेबल, अनधिकृतपणे मिळवणे आणि वापर केल्यास पुढील एका परिक्षेस प्रतिबंध करण्यात येणार आहे.
  • परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, मिळवणे, विकणे व विकत घेणे तसेच भ्रमणध्वनी आणि अन्य इलेक्ट्राॅनिक्स माध्यमावर प्रसारित केली तर पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.