मागील महिनाभरापासून चर्चेला आलेला इयत्ता दहावीच्या निकालावर अखेर राज्य सरकार निश्चित निर्णयावर येऊन पोहचले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावीच्या निकालाबाबत शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढला आहे. यामध्ये सरकारने इयत्ता दहावीची परीक्षा न घेण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. तसेच आंतरिक मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल लावण्यात येणार आहे, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्याआधी त्यांनी या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, पालक, मुख्याध्यापक यांच्याशी 24 बैठका घेण्यात आल्या असे सांगत वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू, असे सांगितले.
असा असणार निकाल?
- प्रत्येक विषयाला – १०० गुण
- नववी निकालावर – ५० टक्के गुण
- लेखी मूल्यमापन – ३० टक्के गुण
- गृहपाठ आणि तोंडी परीक्षा – २० टक्के गुण
(हेही वाचा : १०वीच्या निकालाचा निर्णय गुगल फॉर्म सर्व्हेनूसारच! सरकारची न्यायालयात कोंडी होणार?)
अशी असेल ११ वी प्रवेशप्रक्रिया!
- ११वीच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा.
- २ तासांची असणार प्रवेश पूर्व परीक्षा
- दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित होणार परीक्षा
- प्रवेश पूर्व परीक्षा देणाऱ्यांना ११ प्रवेशासाठी प्राधान्य!
- प्रवेशपूर्व परीक्षा वैकल्पिक असणार
उच्च न्यायालयालाही कळवणार?
राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याविरोधात धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयावर खडे बोल सुनावले होते. तसेच दहावीचा निकाल आणि ११वी प्रवेशप्रक्रिया यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे शुक्रवार, २८ मे रोजी राज्य सरकार न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे घेतलेल्या निर्णयाची माहिती देणार आहे. त्यावर न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
(हेही वाचा : १०वीच्या निकालाचा गोंधळ! ११वीचे टेन्शन!)
Join Our WhatsApp Community