SSC Exam: 6 फेब्रुवारीपासून मिळणार दहावीचे हाॅल तिकीट

148

दहावी बोर्ड परिक्षेचे हाॅलतिकीट 6 फेब्रुवारी दुपारी 3 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बोर्ड परीक्षेचे हाॅलतिकीट विद्यार्थ्यांसाठी 6 फेब्रुवारी दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहेत. सर्व माध्यमिक शाळांनी दहावी बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना हाॅलतिकीट प्रिंट करुन द्यायचे आहे.

( हेही वाचा: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२३ : भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान… तरच टीम इंडियाला मिळेल WTC फायनल खेळण्याची संधी )

हाॅल तिकीट प्रिंट करुन देताना त्यासाठी कुठलेही शुल्क आकारु नये, सोबतच प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकाचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी, अशा सूचना बोर्डाने केल्या आहेत. हाॅल तिकीटामध्ये विषय आणि माध्यम यामध्ये बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. हाॅल तिकीटामध्ये फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ या संदर्भात दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायचे आहे. प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास, संबंधित माध्यमिक शाळांनी त्याची पुन्हा प्रिंट काढून त्यात लाल शाईने द्वितीय प्रत म्हणजेच डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हाॅल तिकीट द्यायचे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.