SSC Exam : कॉपीमुक्त अभियानासाठी सरकारचा मोठा निर्णय ; 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर असणार ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

38
SSC Exam : कॉपीमुक्त अभियानासाठी सरकारचा मोठा निर्णय ; 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर असणार ड्रोन कॅमेऱ्यांची नजर
SSC Exam : कॉपीमुक्त अभियानासाठी सरकारचा मोठा निर्णय ; 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर असणार ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर व आसपासच्या परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन द्वारे (Drone camera) निगराणी केली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. (SSC Exam)

हेही वाचा-Delhi Assembly Elections : दिल्लीतील उत्तर प्रदेश, हरियाणा सीमाभागात सुरक्षा व्यवस्था कडक

परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण देखील करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा (Copy-free exam) होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके उपलब्ध होतील याचेही नियोजन करण्यात येणार आहे. (SSC Exam)

हेही वाचा-Working Hours : आठवड्याला ९० तास काम?; केंद्र सरकारचे लोकसभेत लेखी उत्तर

परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची (FCR) Facial Recognition System व्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड (Board) परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (SSC Exam)

हेही वाचा-Tiger Hunting : महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील वन विभागांना रेड अलर्ट ; वाघांची शिकार करणाऱ्या ७ टोळ्या सक्रिय

दहावी आणि बारावीच्या परीक्षांवेळी स्थानिक गुंडगिरी व स्थानिक यंत्रणांवर दबाव टाकून परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस येतात. या कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यातील दहावीची बोर्ड परीक्षा (SSC Exam) 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.

झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद
विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल. (SSC Exam)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.