SSC HSC Exam 2024 : राज्यभरातील शिक्षण संस्थाचालकांचा दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार ?

दहावी बारावीच्या परीक्षा आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकरिता बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा दिला आहे.

426
SSC HSC Exam 2024 : राज्यभरातील शिक्षण संस्थाचालकांचा दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार ?

बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना (SSC HSC Exam 2024) जानेवारी महिन्यात तर फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षा सुरू होणार आहे. मात्र बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मागण्या मान्य होईपर्यंत परीक्षांना बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि अर्थमंत्री आमच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढत नाही तोपर्यंत आमच्या शाळांच्या इमारती व कर्मचारी बोर्डांच्या परीक्षाकरता उपलब्ध करून देणार नाही अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने (SSC HSC Exam 2024) घेतली आहे.

(हेही वाचा – Iran मध्ये दोन बॉम्बस्फोट; १०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू)

नेमकं प्रकरण काय ?

वर्षानुवर्षे रखडलेली शिक्षक भरती, मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जागा, शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींचे शिक्षकेतर अनुदान यासारख्या कारणामुळे शाळा आणि शिक्षण संस्था डबघाईस आल्या आहेत, शिक्षणाची गुणवत्ता घसरल्याचा शिक्षा संस्थाचालकांचा आरोप आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकार आमच्या प्रलंबित मागण्यांबद्दल निर्णय घेत नाही. थकलेले अनुदान देत नाही, तोवर आम्ही दहावी बारावीच्या परीक्षांसाठी (SSC HSC Exam 2024) आमच्या शाळा परीक्षा केंद्र म्हणून देणार नाही, परीक्षेच्या कामासाठी आमचा कर्मचारी वर्ग देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे. त्यामुळे राज्यात पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेवर वेगळच संकट येण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Covid – 19: कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे, ‘या’ राज्यांमध्ये लागू केली मास्क सक्ती)

‘या’ दिवशी होणार परीक्षा –

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC HSC Exam 2024) बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालवधीत होणार आहे. इयत्ता १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी, 2024 ते गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 व इयत्ता 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी, २०२४ ते मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Ram Temple Threat : बॉम्बस्फोट धमकी प्रकरणी एसटीएफकडून दोघांना अटक)

शिक्षण संस्थाचालकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे –

१. राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. 2012 पासून अजूनपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही.ती ताबडतोब करण्यात यावी.

२. २००४ ते २०१३ पर्यंतचे महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे वेतनेत्तर अनुदान थकीत द्यावे

३. प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध

४. नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदी बाबत माहिती द्यावी.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.