SSC, HSC Exam : कॉपी कराल तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार

39
SSC, HSC Exam : कॉपी कराल तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार
SSC, HSC Exam : कॉपी कराल तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार

काही दिवसांवरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा (SSC, HSC Exam) होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसंच जर विद्यार्थी कॉपी (copy) करताना पकडला गेला, तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी दिला आहे. कॉपी मुक्त परिक्षेसाठी मंडळ प्रयत्नशिल असल्याचेही ते म्हणाले. (SSC, HSC Exam)

हेही वाचा-नवीन कायदे लागू करताना कामगार हिताची काळजी घेणार; Akash Pandurang Fundkar यांची ग्वाही

11 फेब्रुवारी पासून 12 वीची परिक्षा (SSC, HSC Exam) सुरू होत आहे. ही परिक्षा कॉपी मुक्त करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कॉपी मुक्त अभियानही राबवलं गेलं आहे. शिवाय विद्यार्थ्यांना परिक्षा सुची दिली आहे. त्याचे पालन करावे असे आवाहन ही शरद गोसावी यांनी केले आहे. विद्यार्थी (students) आणि त्यांना कॉपी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवरही फौजदारी गुन्हा दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांनी शांत पणे पेपर लिहावेत असंही ते म्हणाले. (SSC, HSC Exam)

हेही वाचा-RBI Monetary Policy : रेपोदरात ०.२५ अंशांची कपात, कर्जाचे हप्ते होणार स्वस्त

विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर समुपदेशक नेमण्यात आले आहेत. त्यांची मदत विद्यार्थ्यांना घेता येईल. जर विद्यार्थी तणावात असतील? परिक्षा कशी द्यायची याचा ताण त्यांच्यावर असेल तर ते समुपदेशकाची मदत घेवू शकतात. त्यांना ते फोनवर संपर्क करू शकतात असंही गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र त्यानंतरही कुणी कॉपी करताना आढळल्यास त्या विरोधात कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. याबाबतती माहिती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनाही कळवण्यात आली आहे. (SSC, HSC Exam)

हेही वाचा-मिठाईत किडे सापडल्याने उडाली खळबळ; FDA ने केली कारवाई

अनेक वेळी परिक्षा केंद्रावर विद्यार्थी हॉल तिकीट (Hall ticket) घेवून जाण्यास विसरतात. अशा वेळी त्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही. हॉल तिकीट नसेल तरी त्या विद्यार्थ्याला परिक्षेला बसले जावू दिले जाणार आहे. मात्र त्याच्याकडून हमी पत्र लिहून घेतले जाईल. दुसऱ्या दिवशी मात्र त्याला हॉल तिकीट आणावे लागेल असंही त्यांनी सांगितलं. (SSC, HSC Exam)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.