दहावी, बारावी निकालाच्या तारखा जाहीर

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. 10 जूनपर्यंत दहावी तर 20 जूनपर्यंत बारावीचे निकाल जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून  सांगण्यात आले आहे.

परीक्षेच्या शेवटच्या पेपरनंतर 60 दिवसांच्या कालावधीत निकाल जाहीर केला जातो. पण यंदा बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा म्हणजे 10 जूनपर्यंत जाहीर केला जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे.

अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता निकाल

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. बारावीच्या परीक्षेला यंदा 14.72 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. तर 16.25 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. महाराष्ट्र एसएसी आणि एचएससीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांचा स्कोअर अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जाऊन तपासून आणि डाऊनलोड करु शकतील.

( हेही वाचा: नवनीत राणांच्या तक्रारींची केंद्राकडून दखल; 23 मे रोजी सुनावणी )

जूनमध्ये निकालाच्या तारखा निश्चित

पेपर तपासण्याचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 30 टक्यांमध्ये बार कोड स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आता बारावी आणि दहावी परीक्षांच्या निकालांसाठी 10 आणि 20 जून या तारखा निश्चित केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here