दहावी पास आहात? SSC अंतर्गत तब्बल ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, मराठीत देता येणार परीक्षा

125

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत हवालदार, सफाईवाला, दफ्तरी, ऑपरेटर, शिपाई, जमादार, चौकीदार, माळी आणि इतर अशा विविध ११४०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १७ फेब्रुवारी २०२२ आहे.

( हेही वाचा : बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण; उद्धव ठाकरे अनुपस्थित, राज ठाकरेंची हजेरी )

स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी), मल्टि टास्किंग पदांसाठी प्रथमच मराठीसह १३ भाषांमधून परीक्षा घेण्यात येणार आहे. नोकरी मिळण्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये त्यामुळे इंग्रजी, हिंदी तसेच १३ प्रादेशिक भाषांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

अटी व नियम जाणून घ्या…

  • पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)
  • पदसंख्या – ११ हजार ४०९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा
  • वयोमर्यादा – १८ ते २५ आणि १८ ते २७ वर्ष
  • अर्ज शुल्क :
    सामान्य, OBC, EWS उमेदवारांचे शुल्क – १०० रुपये
    महिला, SC, ST उमेदवारांचे शुल्क – ० रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – १८ जानेवारी २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ फेब्रुवारी २०२३
  • अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.