सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी असून, कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड C & D पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2022 आहे.
( हेही वाचा : बेस्ट हा भ्रष्टाचाराचा अड्डा; लवकरच पोलखोल करणार मनसेचा इशारा)
अटी व नियम
- पदांचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड C & D
- शैक्षणिक पात्रता – बारावी पास
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- वयोमर्यादा –
स्टेनोग्राफर ग्रेड C- 18 ते 30 वर्षे
स्टेनोग्राफर ग्रेड D- 18 ते 27 वर्षे - अर्ज शुल्क –
Women/SC/ST/PWD/Ex – Nill
इतर उमेदवारांसाठी – रु. 100/- - अर्ज भरण्याची तारीख – 20 ऑगस्ट 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2022
- अधिकृत वेबसाइट – ssc.nic.in
- प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
- अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.