महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC Result) परीक्षेचा निकाल शुक्रवारी (२ जून ) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली.
निकाल पाहण्यासाठीच्या लिंक :
१. mahresult.nic.in
२. https://ssc.mahresults.org.in
३. http://sscresult.mkcl.org
यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC Result) व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची (SSC Result) लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत झाली. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.
Join Our WhatsApp Community