SSC Result 2022: १७ जूनला दहावीचा निकाल होणार जाहीर

17 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. आता दहावीच्या मुलांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र स्टेट बाोर्ड ऑफ सेकेंडरी अॅंड एज्युकेशन मार्फत 17 जूनला दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांना नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते. मंडळाकडून 20 जूनपर्यंत निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आता 17 जूनला दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होईल.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here