महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या मार्च-एप्रिलमध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांची विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेशपत्रे शुक्रवारी दुपारी 1 वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार असून त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले आहे. आता विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाइन देण्याची यंत्रणा सज्ज झालेली आहे.
कुठे मिळणार हॉलतिकीट
राज्य मंडळाच्या www.mahahsccboard.in या संकेतस्थळावर शाळा लॉग-इनमधून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा लागणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा – काय सांगताय… आता लवकरच हवेत उडणाऱ्या बस दिसणार!)
सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी प्रवेशपत्रे ऑनलाइन प्रिंट काढून ती विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community