ST Bus चा ठावठिकाणा आता मोबाईलवर; येत्या महिन्यात सुरू होणार ॲप

54
ST Bus चा ठावठिकाणा आता मोबाईलवर; येत्या महिन्यात सुरू होणार ॲप
  • प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आपल्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या महिन्याभरात एसटी बसचा (ST Bus) ठावठिकाणा मोबाईल ॲपद्वारे कळणार असल्याची ग्वाही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या ॲपमुळे प्रवाशांना लोकल ट्रेनप्रमाणे बस कुठपर्यंत पोहोचली आहे, हे थेट मोबाईलवर पाहता येईल.

(हेही वाचा – Salman Khan ला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी ; म्हणाले, “बॉम्बने उडवू …”)

मुंबईत महामंडळाच्या मुख्यालयात अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सरनाईक यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, “सर्व १५,००० बसेसना (ST Bus) जीपीएस यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन महिन्यांत हे पूर्ण होईल, तर ॲप पुढील महिन्यातच उपलब्ध होईल.” सध्या १२,००० बसेसना जीपीएस बसवले असून, उर्वरित ३,००० बसेसचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी असा उपक्रम हाती घेतला होता, परंतु तो अपूर्ण राहिला.

(हेही वाचा – Mehul Choksi Arrested : सीबीआयच्या प्रयत्नांना अखेर यश ! आरोपी मेहुल चोक्सीला भारतात कधी आणणार?)

या ॲपद्वारे प्रवासी बसचे (ST Bus) नेमके स्थान, मार्ग, आणि आगमन-प्रस्थान वेळ जाणून घेऊ शकतील. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी ॲपमध्ये विशेष सुविधाही असेल. सरनाईक यांनी ठेकेदाराला जीपीएस बसवण्यात उशीर झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच, नवीन बसेसना जीपीएस आणि सीसीटीव्हीसह सुसज्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. ही सुविधा प्रवाशांचा वेळ वाचवेल आणि प्रवास अधिक सुकर करेल. दररोज ६० लाख प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या या पावलामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत क्रांती येण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांनी या ॲपचे स्वागत केले असून, लवकरात लवकर सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.