ST Bus Stand : एसटी स्थानकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबविणार

60
ST Bus Stand : एसटी स्थानकांवर
ST Bus Stand : एसटी स्थानकांवर "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान" राबविणार

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (२३ जानेवारी) पुढील वर्षभर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व बसस्थानकांवर “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबवले जाणार आहे. या अभियानाचे उद्दिष्ट प्रवाशांना स्वच्छ, सुंदर आणि सुसज्ज बसस्थानके उपलब्ध करून देणे आहे. (ST Bus Stand)

(हेही वाचा- Davos 2025 : दावोस वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने केलेले ६ प्रमुख करार.. वाचा यादी)

३ कोटी रुपयांची बक्षिसे:

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अभियानाची घोषणा केली असून, यासाठी एकूण ३ कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. ‘अ’ वर्गातील राज्यस्तरावर पहिले येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटी रुपये, ‘ब’ वर्गातील बसस्थानकाला ५० लाख रुपये, तर ‘क’ वर्गातील बसस्थानकाला २५ लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. (ST Bus Stand)

अभियानाचा शुभारंभ:

२३ जानेवारी रोजी कुर्ला येथील नेहरूनगर बसस्थानकावर परिवहन मंत्री सरनाईक यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था, आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहभागातून राज्यभरात बसस्थानकांवर सखोल स्वच्छता मोहीम राबवली जाईल. (ST Bus Stand)

(हेही वाचा- ED सारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं; Bombay High Court ने ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड)

संकल्पना आणि उद्दिष्ट:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू होणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश स्वच्छ व सुंदर बसस्थानकांची निर्मिती करणे आणि निर्जंतुक, स्वच्छ प्रसाधनगृहे प्रवाशांना कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हा आहे. “आपलं गाव, आपलं बसस्थानक” या संकल्पनेवर आधारित हे अभियान लोकसहभागातून बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देईल. (ST Bus Stand)

स्पर्धा आणि मूल्यमापन प्रक्रिया:

राज्यातील बसस्थानकांची प्रवासी चढ-उतार संख्येनुसार तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे – ‘अ’ (शहरी), ‘ब’ (निमशहरी), आणि ‘क’ (ग्रामीण). दर तीन महिन्यांनी बसस्थानकांचे मूल्यांकन करून प्रादेशिक आणि राज्यस्तरावर स्पर्धा घेण्यात येईल. (ST Bus Stand)

(हेही वाचा- Malegaon येथे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना बनावट जन्मदाखले; एसआयटीकडून छाननी सुरु)

सामाजिक सहभागाचे आवाहन:

मंत्री सरनाईक यांनी तरुण मंडळे, महिला बचत गट, सामाजिक संस्था आणि उद्योग समूहांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. बसस्थानकांचा स्वच्छतेसह सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. (ST Bus Stand)

हे अभियान वर्षभर चालणार असून, यामुळे एसटी बसस्थानकांचे स्वरूप बदलून प्रवाशांना स्वच्छ व सुंदर सेवा देणे शक्य होईल. (ST Bus Stand)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.