ST Bus अस्वच्छ अनेक बसेसमध्ये पान, गुटखाच्या पिचकाऱ्या, प्रवाशांना मनस्ताप

46
ST Bus अस्वच्छ अनेक बसेसमध्ये पान, गुटखाच्या पिचकाऱ्या, प्रवाशांना मनस्ताप
ST Bus अस्वच्छ अनेक बसेसमध्ये पान, गुटखाच्या पिचकाऱ्या, प्रवाशांना मनस्ताप

राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा पुरविणाऱ्या एसटी बस रस्त्यात नादुरुस्त होणे, गळक्या बस, सीट, काचा तुटलेल्या बस प्रवाशांसाठी काही नवीन नाही. बसमधील अस्वच्छतेमुळे आता प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्याही आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (ST Bus)

(हेही वाचा- Devendra Fadnavis: “धर्मवीर ३ ची पटकथा मी लिहिणार”, फडणवीसांच्या विधानाने चर्चांणा उधाण)

शासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले होते. या अंतर्गत सर्व आगाराप्रमुखांना एसटी बस आणि बसस्थानके स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. एसटी बस अस्वच्छ आढळल्यास आगारप्रमुखांना ५०० रुपये दंडाची घोषणा केली होती. मात्र हे अभियान आटोपल्यानंतर परिस्थिती जैसे थे झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. (ST Bus)

आजही जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक बसमध्ये केरकचरा, सिटलगत गुटखा, मावा खाऊन थुंकलेले डाग दिसून येतात. चालकांची कॅबिन, डॅशबोर्ड, सिटखाली कचऱ्याचे साम्राज्य असते. कित्यके बसच्या सिटा फाटलेल्या, तुटलेल्या अवस्थेत असतात. खिडक्या तर अक्षरक्षः खुळखुळा झालेल्या असतात. स्थानकांची काही वेगळी अवस्था नाही. विशेष म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानानंतर मात्र अनेक एसटी बसेसमध्ये अस्वच्छता असल्याचे दिसून येत आहे. या अस्वच्छ बस स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आगारप्रमुखांवर असली तरी या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सध्या राज्य परिवहन महामंडळात बसस्थानकात दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छ बस न ठेवणाऱ्या आगारप्रमुखांना दंड करणार तरी कोणी, हा खरा प्रश्न आहे.  (ST Bus)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.