लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) घोषणा झाल्यापासून देशभरात तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. या काळात आता सरकारला कोणतेही नवे धोरणात्मक निर्णय, प्रकल्पांची घोषणा किंवा भूमिपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम घेता येणार नाहीत. परिणामी आचारसंहितेच्या काळात प्रशासकीय निर्णय आणि नवी विकासकामे हाती घेण्याची प्रक्रिया जवळपास ठप्प होते. महाराष्ट्रातही याच कारणामुळे एसटी महामंडळाला (MSRTC) मोठा फटका बसला आहे. (ST Buses)
(हेही वाचा – Muslim Attack : तेलंगाणामध्ये होळी साजरी करणार्या हिंदूंवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून हल्ला)
900 कोटी रुपयांची तरतूद
राज्याच्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी 900 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून एसटी महामंडळ 2200 नव्या बसगाड्यांची खरेदी करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्चला पत्रकार परिषद देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आणि वेळापत्रक जाहीर केले. त्यानंतर देशभरात आचारसंहिता लागू झाल्याने ही गाड्यांची खरेदी रखडली आहे.
1000 गाड्या निघणार भंगारात
15 वर्षे होऊन गेलेल्या जवळपास एक हजार गाड्या स्क्रॅपिंगसाठी आलेल्या असतानाही नव्या गाड्या दाखल होण्यास उशीर होत आहे. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे पुढील किमान तीन महिने ही खरेदी रखडणार आहे. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण 15000 गाड्या आहेत. त्यातील 1000 गाड्या येत्या सहा महिन्यात पंधरा वर्षे पूर्ण झाल्याने स्क्रॅप कराव्या लागणार आहेत. प्रत्यक्षात महामंडळाला 18 हजार गाड्यांची गरज आहे. (ST Buses)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community