आता ‘एसटी’ च्या बसगाड्या खाजगी पेट्रोल पंपावर डिझेल भरणार! काय म्हटले पत्रकात, वाचा

132

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने सबसिडीसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे डिझेलच्या दरात वाढ झाल्याने, राज्य परिवहन महामंडळाला कोट्यावधी रुपये जास्त मोजावे लागत होते. त्यातुलनेत खाजगी पेट्रोल पंपावर डिझेलचे दर कमी असल्याने त्या ठिकाणी बसगाडय़ांमध्ये डिझेल भरण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच दि.10/01/2019 ते दि.10.01.2022 इंडियन ऑईल कॉर्पो.लि. आणि भारत पेट्रोलियम कॉर्पो.लि. यांच्यासोबत करार करण्यात आला होता. आता हा करार संपल्याने त्याची मुदत दोन वर्षांसाठी वाढवण्याकरता, महामंडळाने पत्रक जारी केले आहे.

म्हणून घेण्यात आला निर्णय

16 मार्च 2022 रोजी मे. इंडियन ऑईल कॉर्पो. लि. यांनी सादर केलेल्या दराची तुलना आणि महामंडळास डिझेल पुरवठा करण्यात आलेले दर यामध्ये रु.22.61 प्रति लिटर जास्त  असल्याचे निर्देशनास आल्याने खाजगी पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याचा निर्णय घेण्यात आला.  महामंडळावर अर्थिक भार वाढत असल्याने, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी महामंडळाने स्वतःच्या आगारातून तेल पुरवठा कंपनीकडून डिझेल घेण्याऐवजी बाजारातून किरकोळ खरेदी पद्धतीने डिझेल खरेदी करण्याचा पर्याय निवडावा लागत आहे. अशा प्रकारे डिझेल खरेदी करीत असताना सर्वच स्तरावरील नियत्रंण समिती, विभाग व आगारातील अधिकारी व कर्मचारी यांनी डिझेलचा भरणा बसेसमध्ये करताना अत्यंत काटेकोर व काळजीपूर्वक कार्यप्रणालीची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

( हेही वाचा :होळी, गुढीपाडव्यावर जमावबंदीचे संकट! )

रा.प. बसेस व खातेवाहने खाजगी मालकीच्या डिझेल विक्री करणा-या पंपधारकाकडून डिझेलच्या बसेसमध्ये थेट भरणा करण्याकरता कार्यप्रणाली सक्षमपणे राबवण्यासाठी खालीलप्रमाणे सविस्तर सूचना देण्यात येत आहेत.

  • खाजगी मालकीच्या डिझेल पंपाची निवड करताना, आगारातील बसेसच्या चालनाचा कालावधी लक्षात घेऊन त्या कालावधीमध्ये बसेसना आवश्यक मात्रेचे डिझेल उपलब्ध होऊ शकेल अशाच पंपाची निवड करावी जेणेकरुन डिझेल न मिळाल्यामुळे बसेस मार्गबंद राहण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.
  • डिझेल पंपाची निवड करतांना स्पर्धात्मक दर त्यावरील सुट तसेच देयकांचे भुगतान करण्याचा क्रेडिट कालावधी व व्यर्थ कि.मी. यांची सांगड घालून महामंडळास आर्थिकदृष्टया फायदेशीर असलेल्या डिझेल पंपाची निवड करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
  •  पुरवठादाराची निवड ही परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वे व महामंडळाचे सर्वसमावेश हित विचारात घेऊन विभाग नियंत्रक, विभागीय लेखा अधिकारी, विभागीय भांडार अधिकारी व संबंधीत आगार व्यवस्थापक यांच्या समितीव्दारे तातडीने निश्चित करायची व त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी. पुरवठादाराची निवड करताना त्यांच्याकडून दरपत्रक घेण्यात यावे, त्यात दर तसेच देण्यात येणारी सूट व क्रेडिट याबाबत स्पष्ट माहिती असावी.
  • मोठया शहरामध्ये महामंडळाचे एकापेक्षा जास्त आगार असल्यास, प्रत्येक आगाराने वेगवेगळ्या मार्गावरील डिझेल पंपाची निवड करताना प्राधान्याने ज्या मार्गावर महामंडळाच्या मोठया प्रमाणात फे-या आहेत, अशाच मार्गावरील डिझेल पंपाची निवड करताना सदर बाब विचारात घ्यावी.
  • ज्या खाजगी मालकीच्या डिझेल पंपधारकाचे एकाच ठिकाणी एकापेक्षा अधिक पंप आहेत, त्यापैकी एक पंप खास महामंडळाच्या बसेससाठी येणा-या जाणा-या मार्ग विचारात घेऊन राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.
  •  एका वेळेस जास्तीत जास्त बसेसना नियतानुसार डिझेल भरता येईल व कोणत्याही परिस्थितीत बसेसचा खोळंबा होणार नाही, यासाठी पुरेशी जागा पंपावर उपलब्ध आहे याची खात्री करावी. वाहतुकीची कोंडी (ट्रॅफिक जॅम) होऊ नये म्हणून आवश्यकतेनुसार इंधन भरणा करण्याच्या वेळा ठरवण्यात यावा.
  • रा.प. बसेसना खाजगी मालकीच्या डिझेल पंपावर इंधनाचा भरणा करताना कायमस्वरुपी इंधन लिपिक व सुरक्षा रक्षक यांची नियुक्ती करण्यात यावी. सुरक्षा रक्षक उपलब्ध नसल्यास, अन्य कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात यावी. सदरची नियुक्ती इंधन भरण्याचा कालावधी विचारात घेऊन करावी.
  • बसेस व खातेवाहनांमध्ये इंधन भरण्याकरता सद्य अस्तित्वात असलेल्या सर्व नोंदवहयांचा वापर करायचा आहे. डिझेल भरणा करण्यासंबंधीत सद्याच्या कार्यप्रणाली नुसार उदा. 201 रजिस्टर, लॉगशीट इत्यादीवरील नोंदी कायम राहतील व त्यात कोणत्याही प्रकारचा बदल न करता संपूर्ण नोंदी अचूक व परिपूर्णपणे केल्या जातील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच 201 रजिस्टरच्या शेवटच्या कॉलममध्ये सदर पंपाचे डिझेल देणा-या कर्मचा-यांचे नाव व स्वाक्षरी घेण्यात यावी.
  • खाजगी मालकीच्या पंपावर डिझेल भरताना इंधन लिपिक, अन्य कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक नसताना इंधन भरणा केला गेल्याचे, आढळून आल्यास सदरची बाब गंभीर समजून कार्यवाहीसाठी पात्र समजण्यात येईल.
  • डिझेल पंपाव्दारे अचुक मात्रेचे डिझेल भरणा होण्यासाठी 5 लिटरच्या कॅनने दररोज सुरुवातीस अचुक डिलीव्हरी होत आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यात यावी व त्यानंतरच बसेसना प-युअलिंग करण्यात यावे.
  • खाजगी मालकीच्या डिझेल पंपावर प्रवाशी भरलेले वाहन डिझेल भरण्यसाठी जाताना बसेसमधील प्रवासी डिझेल पंपावर उतरणार नाहीत याची पूर्णतः खबरदारी वाहकाने घ्यायची आहे. तसेच बस पाठीमागे घेण्याची आवश्यकता असल्यास, वाहकाने महामंडळाने दिलेल्या सुचने नुसार  खाली उतरुन चालकास गाडी मागे घेण्यास व मार्गस्थ करण्यास मदत करावी.
  • डिझेलचे घाऊक दर व किरकोळ दर याचा दररोज आढावा घेण्यात यावा. डिझेलचे घाऊकदर व किरकोळ दर जोपर्यंत एकसमान होत नाहीत अथवा दोन्ही दरातील फरक रु.0.25 पैसे पेक्षा अधिक नसेल तोपर्यंत सदरची कार्यवाही अंमलात राहील.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.