शेगाव, शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर चला अर्ध्या तिकिटात; ST ने सुरू केला ‘हा’ उपक्रम

8795
शेगाव, शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर चला अर्ध्या तिकिटात; ST ने सुरू केला 'हा' उपक्रम

व्रतवैकल्यांचा महिना म्हणजे श्रावण. या काळात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. प्रमुख देवस्थानालादेखील दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. विशेषतः महिलांची संख्या अधिक असते. त्यामुळे भाविकांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने (ST) ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे आता शेगाव, शिर्डीसह राज्यातील अन्य ठिकाणी दर्शनाला जाण्यासाठी एसटीने प्रवास करणे सुलभ होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (ST) सण-उत्सवादरम्यान प्रवाशांसाठी विशेष बससेवेचे नियोजन केले जाते. ५ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. या काळात मोठ्या संख्येने भाविक महादेव मंदिरात दर्शनासाठी जातात. शिवाय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातूनही भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.

(हेही वाचा – World Indigenous Day 2024 : मूल निवासी दिन का पाळला जातो? युरोप आणि ख्रिस्त्यांच्या अत्याचाराची विद्रुप कहाणी!)

जिल्ह्यातील भाविकांना शेगाव, शिर्डीसह अन्य ठिकाणी देवदर्शनासाठी जाता येणार आहे. एसटी महामंडळाकडून (ST) विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले असून, यामधून महामंडळाला अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होणार होणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने तयारी केली असून प्रवाशांना सुविधा देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातून प्रवाशांच्या मागणीनुसार एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अधिक बसचे नियोजन केले जात असल्याचे एसटी महामंडळाकडून (ST) सांगण्यात आले. उत्पन्नवाढीस होणार मदतएसटी महामंडळाकडून सण-उत्सवा-दरम्यान प्रवाशांसाठी विशेष बससेवेचे नियोजन केले जाते. यंदाही श्रावण महिन्यात बससेवेचे नियोजन करण्यात आले. यामधून महामंडळाला अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. त्या दृष्टिकोनातून महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.