सुट्ट्या पैशांच्या वादावर ST महामंडळाने काढला तोडगा; UPI पेमेंट ठरले लाभदायक

92

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणाऱ्या वादाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी दखल घेतली. सुट्ट्या पैशावरून वाद होऊ नये यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआयद्वारे तिकीट (Ticket) काढण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळू लागला असून मागील काही दिवसांपासून यूपीआयद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे. (ST)

दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाने (State Transport Corporations) तिकीट दर वाढीनंतर यूपीआयद्वारे केलेल्या तिकीट विक्रीतून १५ कोटी ८८ लाख ६२ हजार ५०४ रुपये इतका महसूल मिळविला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यूपीआयच्या माध्यमातून तिकीट खरेदीत सुमारे दुपटीने वाढ झाली आहे. भाडेवाढीमुळे चिल्लरवरून वाद होण्याची चिन्हे असताना तिकीट खरेदीसाठी यूपीआयचा पर्याय एसटी प्रवाशांसाठी सोयीचा ठरत आहे. 

एसटीने तिकीट दरांमध्ये २६ जानेवारीपासून वाढ केली आहे. ही भाडेवाढ १ रुपयाच्या पटीत केल्याने. सुट्टया पैशांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी कंडक्टरकडे १०० रुपयांची चिल्लरही आगाऊ देण्यात येत आहे.

(हेही पाहा –तुकडे करून ठार मारलेल्या Shraddha Walker च्या वडिलांचा मृत्यू )

१४.९५ टक्क्यांची तिकीट दरात वाढ 

शासनाने एसटीच्या तिकीट दरात १४.९५ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे नव्या दराप्रमाणे फुल तिकीट ११, २१, ३१, ४१, ५१, ६१, ७१, ८१, ९१ आणि हाफ तिकीट ६, ११, १६, २१, २६, ३१, ३६, ४१, ४६,५१, ५६ रुपये किमतीचे झाले आहे. पूर्वी भाडे पाच 3 रुपयांच्या पटीत होते. ते नवीन भाडेवाढीमध्ये एक रुपयाच्या पटीत करण्यात आले आहे. पूर्वी भाडे पाच रुपयांच्या पटीत होते. ते नवीन रुपयाच्या पटीत करण्यात आले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.