दरवर्षी ५ हजार लालपरी बसेस खरेदी करण्याचा ST Corporation चा निर्णय

32
दरवर्षी ५ हजार लालपरी बसेस खरेदी करण्याचा ST Corporation चा निर्णय
  • प्रतिनिधी

महाराष्ट्र एसटी महामंडळ (ST Corporation) दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार लालपरी बसेस खरेदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी पंचवार्षिक नियोजन तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यापुढे महामंडळ भाडेतत्त्वावर बसेस घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित एसटी महामंडळाच्या (ST Corporation) कामकाज आढावा बैठकीत मंत्री सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला. बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांसह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री म्हणाले की, पुढील पाच वर्षांत प्रवासी सेवेतून बाद होणाऱ्या (स्क्रॅपिंग) बसेसचा विचार करून नवीन बस खरेदीची योजना आखली जाईल. इलेक्ट्रिक बसेससाठी प्रत्येक आगारात चार्जिंग स्टेशन उभारले जाईल. महामंडळाच्या (ST Corporation) उत्पन्नात वाढ करण्यासाठी पूरक योजना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत मिळेल याची खात्री करण्यासाठी महामंडळाने उपाययोजना कराव्यात, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – Republic Day Parade 2025 : महाराष्ट्रातील 12 स्वयंसेवकांचा कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव)

जाहिरात धोरणातून उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट

एसटी महामंडळाच्या (ST Corporation) बसेसवर डिजिटल जाहिरातींची सोय करून यामधून १०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महामंडळासाठी नवीन जाहिरात धोरण तयार केले जाईल, असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले.

डिझेल पंप व टोल माफीचा विचार

महामंडळाच्या (ST Corporation) डेपोमध्ये असलेल्या डिझेल पंपांचा व्यावसायिक वापर केला जाईल. यासाठी इंधन कंपन्यांसोबत करार करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महामंडळाच्या बसेसना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल माफी मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. या निर्णयांमुळे एसटी महामंडळाची कार्यक्षमता वाढण्यासोबतच प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.