ST Employee: एसटी कर्मचा-यांची संक्रांत गोड; सरकारकडून 300 कोटी वितरित

ST Employee MSRTC ST Employees soon get payment 300 crore rupees distributed by state Government
ST Employee: एसटी कर्मचा-यांची संक्रात गोड; सरकारकडून 300 कोटी वितरित

राज्यातील 90 हजार एसटी कर्मचा-यांसाठी खुशखबर आहे. एसटी कर्मचा-यांचे रखडलेले पगार  शुक्रवारी (आजच) होणार आहेत. सरकारने एसटी कर्मचा-यांच्या पगारासाठी 300 कोटी रुपये वितरित केले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचा-यांची संक्रांत गोड होणार आहे.

जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी कर्मचा-यांना पगार मिळाला नसल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले होते. संपादरम्यान, पगारासाठी 4 वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र ते पाळण्यात येत नसल्यामुळे 90 हजार एसटी कर्मचारी नाराज होते. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

( हेही वाचा: MPSC विद्यार्थ्यांचे राज्यभर आंदोलन; 2025 पासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याची मागणी )

सरकारकडून तातडीने 300 कोटी मंजूर

सरकारकडून न्यायालयात दिलेला शब्द पाळला न गेल्याने, एसटी संघटना महामंडळाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करेल, अशी नोटीस बाजावली होती. 90 हजार कर्मचा-यांमध्ये वेळेवर पगार न झाल्याने खदखद होती. त्यामुळेच सरकारने तातडीने पावले उचलत 300 कोटी वितरित केले आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here