Palghar : पेट्रोलच्या रांगेत घुसली एसटी ; पाच वर्षांचा मुलगा जखमी

पेट्रोल साठी लागलेल्या लांबलचक रांगेत भरधाव एसटी घुसल्याने अपघातात पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना पालघर मध्ये घडली.

247
Palghar : पेट्रोलच्या रांगेत घुसली एसटी ; पाच वर्षांचा मुलगा जखमी

पालघर जिल्ह्यात पेट्रोल भरण्यासाठी पंपावर अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. तेथील एका लांबलचक रांगेत भरधाव एसटी घुसल्याने अपघातात पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बडोदा येथे दाखल करण्यात आले आहे. (Palghar)
ट्रक ,टेम्पो आणि रिक्षा यांच्या पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशाच भल्या मोठ्या लागलेल्या रांगेत पालघरवरून बोईसरकडे जाणाऱ्या एका भरधाव एसटीने गर्दीत उभ्या असलेल्या एका टेम्पोला जोरदार धडक दिली आणि ती बस गर्दीत घुसली. त्यामुळे टेम्पोजवळ उभा असलेला पुरब राजभर हा पाच वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. (Palghar)

(हेही वाचा : Ginger Benefits : केवळ खोकला आणि सर्दीसाठीच नाही, तर या 5 आजारांमध्येही उपयुक्त आहे आले)
या दुर्घटनेमुळे त्या भागात काही काळ प्रचंड संतापाचे वातावरण पसरले होते. एसटी चालका विरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंधनाचे टँकर पोहोचत नसल्याने आधीच पट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या वाहनचालकांच्या पालघर-बोईसर या मुख्य रस्त्यावर सकाळी सात वाजल्यापासून लांबलचक रांगा लागल्या होत्या. या रांगांमुळे दोन्ही बाजूने वाहनांची गर्दी वाढली. तणाव वाढला त्यामुळे वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आसिफ बेग यांनी टीमसह तेथे बंदोबस्त ठेवला होता.गंभीर जखमी झालेल्या पाच वर्षांच्या मुलाला आधी पालघरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी बडाेदा येथे नेण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.