-
प्रतिनिधी
राज्य सरकारने एस. टी. महामंडळाच्या तुटीवर तोडगा काढण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले की, एस. टी. महामंडळाला दररोज सुमारे ३ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागते. त्यामुळे भाडेवाढ करणे अपरिहार्य होते.
परिवहन खात्याच्या प्रधान सचिवांकडे सध्या एस. टी. महामंडळ अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासंदर्भात फाईल पाठवण्यात आली होती आणि त्यांनी त्यास मंजुरी दिली आहे.
(हेही वाचा – Ranji Knockout : सूर्यकुमार यादव मुंबईकडून रणजी बाद फेरीत खेळणार)
कर्नाटक पॅटर्न लागू करण्याचा विचार
महाराष्ट्रात कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या धर्तीवर नवीन योजना राबवण्याचा विचार सुरू आहे. प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सेवा पुरवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. या संदर्भात सर्वंकष अभ्यास केला जात आहे. (Pratap Sarnaik)
(हेही वाचा – Bangladeshi infiltrators : बांगलादेशी घुसखोरांचा बीएसएफ जवानांवर हल्ला ; एक जवान जखमी)
प्रीमियम बस सेवा – दरवर्षी ५००० नवीन बस
परिवहन विभागाने प्रीमियम बससेवा सुरू करण्याचा विचार केला असून, दरवर्षी ५,००० नवीन बस सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
सरकारच्या या निर्णयांमुळे प्रवासी सेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, मात्र भाडेवाढीमुळे प्रवाशांवर आर्थिक भार वाढणार आहे. (Pratap Sarnaik)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community