Vardha येथे मद्यधुंद चालकाच्या हातात वारकऱ्यांची एसटी; डिव्हायडरवर आदळली; जीवितहानी नाही

143
Vardha येथे मद्यधुंद चालकाच्या हातात वारकऱ्यांची एसटी; डिव्हायडरवर आदळली; जीवितहानी नाही
Vardha येथे मद्यधुंद चालकाच्या हातात वारकऱ्यांची एसटी; डिव्हायडरवर आदळली; जीवितहानी नाही

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला वारकरी जात असतात. वर्ध्यावरून (Vardha) वारकऱ्यांना घेऊन एसटी (बस क्रमांक MH 14 BT 4676) पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. मध्यरात्री या एसटीचा भीषण अपघात झाला. वर्ध्याहून निघालेल्या एसटीचा पुसदजवळ अपघात झाला. 45 वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या एसटीचा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. त्याच्या वाहनावरील पुसदमधील माहुर फाट्यावर सुधाकर नाईक पुतळ्याजवळ एसटी एका डिव्हायडरला जाऊन आदळली. (bus accident)

(हेही वाचा – Accident Mumbai Pune Expressway : वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू)

मोठी जीवीतहानी टळली

एसटीनं डिव्हायडरला दिलेली धडक एवढी जोरदार होती की, आतमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना जोरदार हादरे बसले, ते घाबरले. एसटी हादरल्यानंतर आतमध्ये बसलेल्यांना जोरदार हादरे बसले होते. अपघातानंतर एसटी जागेवरच थांबली त्यामुळे मोठी जीवीतहानी टळली. एसटी थांबल्यानंतर आतमध्ये बसलेले वारकरी एसटी बाहेर पडले. या अपघातात एक वयोवृद्ध महिला आणि एका तरुणाला या अपघातात दुखापत झाली असून त्याला स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. चालकासोबत या एसटीचा वाहकही मद्यधुंद असल्याचं वारकऱ्यांना आढळून आले.

एवढा मोठा अपघात होऊनही केवळ पांडुरंग पाठीशी होता म्हणूनच आमचा जीव वाचला, अशी भावना एसटी बसमधील वारकऱ्यांनी व्यक्त केली. पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरही अपघात झाला आहे. या अपघातात ५ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर उपचार चालू आहेत. (Vardha)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.