राज्य सरकारने नुकताच एक जीआर काढून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली आहे. (ST Protest) शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. पण शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42 टक्के असून एसटी कर्मचाऱ्यांनाही 42 टक्के महागाई भत्ता मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केली आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली असली, तरी त्यामध्ये अजून ४ टक्के वाढ करावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. येत्या 11 तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानावर हा संप करण्यात येणार असून त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही, तर 13 सप्टेंबरपासून राज्यभर संप करण्याचा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा – DCM Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी स्वतंत्र “भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था” स्थापन करणार)
कामगारांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 13 सप्टेंबरपासून राज्यातील सर्व जिल्हास्तरावर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने काढण्यात आले आहे. (ST Protest)
एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्या
- दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा.
- एसटीची धाववेळ (रनिंग टाईम) निश्चित करावी.
- वाहकांचे (कंडक्टर) बदली धोरण रद्द करावे
- खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करण्यात यावा.
- लिपिक-टंकलेखक पदाच्या बढतीसाठी 240 हजर दिवसांची अट रद्द करावी.
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा.
- अनेक विभागात 10-12 वर्षापासून कर्मचारी TTS आहेत त्यांना एक वेळची बाब म्हणून TS करण्यात यावे
- जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपद्धती त्वरीत रद्द करावी
अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.
ऐन सणासुदीच्या काळात संपाची हाक
मागच्या वर्षी ऐन सणासुदीच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अनेक महिने हा संप चालल्याने राज्यातील नागरिकांचे हाल झाले. मोठ्या शिताफीने सरकारने हा संप मिटवण्यासाठी काही एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या आणि आश्वासने दिली होती. मात्र, अजूनही काही मागण्या आणि पगार रखडल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप पुकारला आहे. (ST Protest)
हेही पहा –