मोठी बातमी! एसटी आंदोलकांना आझाद मैदानातून बाहेर काढले, सीएसएमटी स्थानकात कर्मचा-यांचा आक्रोश

132

एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाचा तिढा काही अद्याप सुटलेला नाही. आझाद मैदानात आंदोलन करणा-या एसटी कर्मचा-यांना शुक्रवारी मध्यरात्री अचानकपणे आझाद मैदानातून बाहेर काढण्यात आले. आमच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. म्हणून आता आम्ही सीएसएमटी स्थानकात ठिय्या दिल्याचे एसटी कर्मचा-यांचे म्हणणे आहे.

सदावर्तेंना अटक

आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांना शुक्रवारी अटक केली आहे.

तोपर्यंत हलणार नाही

सीएसएमटी स्थानकात शेकडोंच्या संख्येने सध्या एसटी कर्मचा-यांनी ठिय्या मांडला आहे. आमची काही माणसे शुक्रवारपासून गायब आहेत. ते जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नसल्याची भूमिका कर्मचा-यांनी घेतली आहे.

( हेही वाचा: मी शरद पवारांवर गुन्हा दाखल केला आहे, आमच्या जीवाला धोका आहे! सदावर्तेंच्या पत्नीचा आक्रोश )

आमच्या जीवाला धोका

शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक केली. यानंतर सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी माझ्या पतीच्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यावर मी गुन्हा दाखल केल्यामुळे शरद पवार हे दबाव तंत्र करत असल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.