ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने महागाई भत्ता मिळणार

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून वाढीव महागाई भत्ता देण्याचे मान्य केले त्याचबरोबर इतरही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने संघटनेने बेमुदत उपोषण मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे

112
ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने महागाई भत्ता मिळणार
ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने महागाई भत्ता मिळणार
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ४२ टक्के दराने महागाई भत्ता देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून आझाद मैदानात सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. परिणामी ऐन गणपतीत एसटीची वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे.

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून एसटी कर्मचाऱ्यांना केवळ ३४ टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. त्यामध्ये सरकारने नुकतीच चार टक्क्यांची वाढ केली होती. तरीही कर्मचाऱ्यांनी वाढीव महागाई भत्त्याबरोबरच वाढीव वेतन आणि अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या माध्यमातून उपोषण सुरू केले होते.

(हेही वाचा-Vidarbha Rains : विदर्भात पावसाचा ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज)

त्याची दखल घेत सरकारच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून वाढीव महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. इतरही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने संघटनेने बेमुदत उपोषण मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकारकडून देण्यात आलेली लेखी आश्वासने
– एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मंजूर
– सण-उत्सव अग्रीमची रक्कम दहा हजारांवरून १२,५०० इतकी वाढवण्याला मान्यता
– मागील महागाई भत्याची थकबाकी, घरभाडे भत्ता व वेतनवाढीतील फरकाबाबत पुढील १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्र्यांची संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक
– कामगार करार थकबाकी आणि वेतनवाढीमधील विसंगती दूर करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी आणि कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसंदर्भात समिती स्थापन करून ६० दिवसांत अहवाल सादर करणार
– कामगारांविरुद्ध प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे मागे घेणे
– चालक वाहक महिला कर्मचान्यांना विश्रांतिगृहात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे. एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या एसटी बसमध्ये मोफत पास सवलत फरक न भरता लागू करणे
– सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांऐवजी एक वर्षाचा मोफत पास सर्व गाड्यांमध्ये उपलब्ध करून देणे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.