केईएम रुग्णालयातील बायोमेट्रिक हजेरीच्या मुद्द्यावरून पुन्हा प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. बायोमेट्रिक हजेरीतून कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीत कामाच्या वेळा देण्यासाठी कर्मचारी 1 ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन करणार आहेत. यासह 4 ऑक्टोबर रोजी केईएम अधिष्ठाता डॉ संगीता रावत यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी आंदोलन करणार आहेत.
( हेही वाचा : महिनाभरात ५५ लाख ज्येष्ठ नागरिकांनी केला मोफत एसटी प्रवास )
बायोमेट्रिक हजेरीच्या मुद्द्यावरून ग्रंथपाल आणइ कर्मचाऱ्यांमधील वाद विकोपाला गेल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिफ्टच्या वेळेवरून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही खास कर्मचाऱ्यांनाच दुपारची शिफ्ट दिली जात आहे. या कर्मचाऱ्यांच्या नावासकट म्युनिसिपल मजदूर युनियनने पालिका वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालयाच्या संचालिका डॉ. नीलम अंद्राडे यांना तक्रार केली. केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांचीही कर्मचाऱ्यांनी तक्रार केली होती. अधिष्ठातांचे आदेशही ग्रंथपाल जुमानत नसल्याने ग्रंथालय विभागातील कर्मचारी एक तारखेपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिला.
Join Our WhatsApp Community