आर्थिक मंदी, वाढणारा खर्च, घटणारी मागणी अशा करणं देत अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून (Staff Reduction) टाकलं आहे. विशेषतः टेक कंपन्यांचा यामध्ये अधिक सहभाग आहे. अशातच पुन्हा एकदा एका टेक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याचे ठरवले आहे. याआधी गूगूल, अॅमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट, मिशो यासाख्या इतर कंपन्यांनी देखील नोकरकपात केली आहे.
(हेही वाचा – Staff Reduction: ‘या’ भारतीय कंपनीने केली १५% कर्मचारी कपात)
नोकरकपातीच्या यादीत आता लिंकडिन (LinkedIn) या कंपनीनेदेखील आता सहभाग घेतला आहे. लिंकडिन कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ३.५ टक्के म्हणजेच ७१६ कर्मचाऱ्यांची कपात (Staff Reduction) करणार आहे. जागतिक आर्थिक दृष्टिकोन आणि मागणीत झालेली घट यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. ही कंपनी मायक्रोसॉफ्टच्या मालकीची कंपनी आहे. लिंकडिनमध्ये सुमारे २०,००० कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या वर्षभरामध्ये कंपनीचा महसूल वाढला असला तरी लिंकडिन कंपनी कर्मचारी कपात केलेल्या कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे.
हेही पहा –
फेसबुकची मूळ कंपनी असणाऱ्या Meta ने २१,००० तर गुगलने १२,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. तसेच अॅमेझॉन, मिशो, शेअर चॅट, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात (Staff Reduction)केली आहे.
Join Our WhatsApp Community