Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; प्रयागराजकडे जाणाऱ्या १८ भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू

137
Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; प्रयागराजकडे जाणाऱ्या १८ भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू

प्रयागराज येथील महाकुंभाला जाणारी एक ट्रेन नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १३ वर येत असताना या ट्रेनला पकडण्यासाठी प्रमाणाच्या झालेल्या गर्दीत मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी (Stampede) झाली. ही ट्रेन पकडण्यासाठी नवी दिल्ली स्थानकात भाविकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे गुदमरल्यासारखे होऊन अनेक प्रवासी बेशुद्ध पडले. यात महिला आणि लहान मुलांना सर्वाधिक त्रास झाल्याने दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आहे.

(हेही वाचा – परदेशी Higher Education राज्यातच मिळणार!)

दिल्ली रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म क्रमांक १३-१४ वर ही मोठी दुर्घटना घडली आहे. प्रयागराजला जाण्यासाठी ट्रेन पकडताना मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी (Stampede) होऊन किमान १८ प्रवासांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात नऊ महिला, चार मुले आणि पाच पुरुष प्रवासी यांचा समावेश होता. मात्र, दिल्ली जीआरपी पोलिसांनी सुरुवातीला प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी झाल्याचे नाकारले होते. प्रवासी मोठ्या प्रमाणावर दगावल्याने रुग्णालयात अनेक जखमी प्रवाशांची प्रकृती नाजूक असल्याने हा आकडा आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.