खुशखबर! यंदाच्या वर्षी सगळे पास! 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे अशक्य होणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने शनिवार, ३ मार्च रोजी महत्वाचा निर्णय घेतला. 

165

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या शिक्षण क्षेत्राची अजून सुटका होताना दिसत नाही. मागील २ महिन्यांपासून हळूहळू शाळा सुरु होत होत्या, मात्र आता कोरोनाही दुसरी लाट आल्यामुळे शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा कोलमडून पडले आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षाबाबत महत्वाचा निर्णय घेतला.

परीक्षा घेणे झाले अशक्य! 

मागील वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. यातून शैक्षणिक क्षेत्रही सुटले नाही. मार्च २०२०पासून राज्यात लॉकडाऊन लावला होता, तेव्हापासून ते आजतागायत राज्यातील शाळा बंद आहेत. दरम्यानच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरु केले, मात्र त्यातून अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने परीक्षाही घेणे शक्य होणार नसल्याने राज्याच्या शालेय शिक्षण खात्याने राज्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी हा निर्णय घोषित केला.

(हेही वाचा : मुख्यमंत्री साहेब, संजय राऊतांना आवरा, अन्यथा…! काँग्रेस नेत्यांचा इशारा! )

इयत्ता पहिली ते ८वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण! 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्यात आल्या. २०२०च्या नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळा उघल्याच नाहीत. त्या आजपर्यंत बंदच आहे. मागील २-३ महिन्यांपासून माध्यमिक वर्ग सुरु करण्यात आले होते. परंतु आता पुन्हा एकदा राज्यातील सर्व भागात कोरोना झपाट्याने पसरू लागला आहे. परिणामी पुन्हा एकदा शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे परीक्षाही घेता येणार नाही. म्हणून अखेर शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर इयत्ता ९ वी आणि १० वीच्या परीक्षांबाबत पुढे सूचित केले जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.