जे.जे. रुग्णालयात स्तनपान सप्ताहाला सुरुवात

दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान जे.जे. रुग्णालयात आरोग्य विभागामार्फत जनजागृतीसाठी स्तनपान सप्ताह राबविण्यात येतो. यावर्षी ग्रँड मेडिकल कॉलेज, सर ज जी समूह रुग्णालय व परिचर्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने स्तनपान सप्ताह १ ते ७ ऑगस्ट दरम्यान साजरा करण्यात येत आहे. Step Up For The Breastfeeding : Eduate and Support ही यंदाच्या स्तनपान सप्ताहाची थीम आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली, यावेळी अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे, विभाग प्रमुख डॉक्टर अशोक आनंद, प्राचार्य डॉक्टर अपर्णा संखे, प्राध्यापक, परिचारिका वर्ग, सर्व विद्यार्थी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

स्तनपान सप्ताहाची वैशिष्ट्ये

1. अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी हिरकणी कक्षाची स्थापना सर्वत्र व्हावी जेणेकरून मातेला कोणत्याही स्थितीत व कोणत्याही स्थळावर स्तनपान करण्यास कुठेही अडचण येणार नाही, हिरकणी कक्षामार्फत आपल्याला आपले उद्दिष्ट साध्य करता येईल असे सांगितले.

2. विभाग प्रमुख डॉक्टर अशोक आनंद (OBGY) म्हणाले, हा सप्ताह साजरा न करता रोजच्या जीवनात सुद्धा नागरिकांमध्ये जागृकता निर्माण होणे गरजेचे आहे. जेणेकरून बाळाला व मातेला कोणत्याही अडचणीला समोर जाणार नाही.

3. डॉक्टर अपर्णा संखे प्राचार्य परिचर्या महाविद्यालय यांनी स्तनपानाची उद्दिष्ट व महत्त्व समजावून सांगितले. स्तनपान सप्ताहाद्वारे जास्तीत जास्त जनजागृती कशी होईल याविषयी मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here