विमानतळापासून Prepaid Auto रिक्षासेवा सुरु करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

 परिवहन विभागाच्या सहकार्याने येत्या १ जूनपासून प्रिप्रेड रिक्षा सेवा सुरू  करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी, असे सरनाईक म्हणाले.

48

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टी-१ आणि  टी -२ टर्मिनल येथे प्रीपेड ऑटो (Prepaid Auto) रिक्षासेवा १ जून २०२५ पासून सुरू करण्याचे निर्देश, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी परिवहन विभाग आणि  अदानी समूहाच्या प्रतिनिधींना दिले.

आज विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड रिक्षासेवा (Prepaid Auto) सुरू करण्याबाबत तसेच नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या कामकाजाचा आढावा  प्रताप सरनाईक यांनी घेतला. या बैठकीला  मत्स्यव्यवसाय आणि  बंदरे मंत्री नितेश राणे, आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री गजानन कीर्तिकर , परिवहन आयुक्त आणि  एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा  व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार, नाशिक आणि  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा औरंगजेबाची कबर हटवता आली नाही, तर…; Sunil Deodhar काय म्हणाले?)

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे  व्यवस्थापन अदानी समूहाकडे असून अदानी समूह आणि  परिवहन विभागाच्या समन्वयातून येत्या दोन महिन्यांत  प्रीपेड  रिक्षा (Prepaid Auto)  सेवा सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ प्रवासी सुविधा उपलब्ध होणार असल्याने विमानतळाचे व्यवस्थापन पहाणाऱ्या अदानी समूहाने  परिवहन विभागाच्या सहकार्याने येत्या १ जूनपासून प्रिप्रेड रिक्षा सेवा सुरू  करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी, असे सरनाईक म्हणाले.

नाशिकचे मेळा बसस्थानक समस्यामुक्त करावे

नाशिक शहरातील एसटी महामंडळाच्या समस्यांबाबतीत भाजपच्या  आमदार देवयानी फरांदे यांनी आज प्रताप सरनाईक यांना  निवेदन दिले. त्यावर  प्रसाधनगृहे, बसस्थानक आणि  परिसर स्वच्छता करुन नवीन बांधलेले  मेळा बसस्थानक एक महिन्यांमध्ये समस्यामुक्त करावे,  असे निर्देश त्यांनी  दिले. देवयानी  फरांदे यांच्या मागणीनुसार महामार्ग बसस्थानकाचा विकास सिंहस्थ निधीतून करण्याबाबत शासनस्तरावर विचार करण्यात येईल. तसेच मेळा बसस्थानकाच्या समस्यांवरही सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन प्रताप  सरनाईक यांनी यावेळी दिले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.