Startups For Women : महिलांच्या स्टार्ट अपना गुंतवणूकदारच मिळेनात?

भारतीय स्टार्टअप क्षेत्रात लिंगभेद होत असल्याची तक्रार होत आहे. 

156
Startups For Women : महिलांच्या स्टार्ट अपना गुंतवणूकदारच मिळेनात?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय स्टार्टअप (Startups) क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतातील महिलांनी सुरू केलेल्या स्टार्टअपना गुंतवणूकदार मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण, महिला संस्थापक असलेल्या सुमारे ६,००० कंपन्या गुंतवणुकदारांशिवाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. ट्रॅक्सन या कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात ८००० च्या वर स्टार्टअप कंपन्या या महिलांनी सुरू केलेल्या आहेत. आणि यातील ६००० च्या वर कंपन्यांकडे गुंतवणुकदारांनी पाठ फिरवली आहे. (Startups For Women)

ज्या २,३०० कंपन्यांमध्ये गुंतवणूक झाली त्यांचं एकत्र बाजारमूल्य २३ अब्ज अमेरिकन डॉलर इतकं आहे. या कंपन्यांपैकी १००० कंपन्या या बीजावस्थेत आहेत. २५१ या उर्जितावस्थेत आहेत. तर फक्त ५१ कंपन्या या पूर्ण क्षमतेनं काम करत आहेत. मागच्या ३ वर्षांचा आढावा घेतला तर महिलांनी सुरू केलेल्या स्टार्टअपमध्ये (Startups) गुंतवणुकीचं प्रमाण हे ७५ टक्क्यांनी कमी झालं आहे. २०२३ मध्ये जेव्हा पुरुषांनी सुरू केलेल्या स्टार्टअपमध्ये ८.३ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक वाढली, तेव्हा महिलांच्या स्टार्टअपमधील (Startups) गुंतवणुकीचं प्रमाण फक्त १.१ अब्ज अमेरिकन डॉलरने वाढलं आहे. (Startups For Women)

(हेही वाचा – किचनमधील या वस्तू कधीच फेकून देऊ नका)

खरंतर स्टार्टअपच्या (Startups) क्षेत्रात भारतीय कंपन्यांमधील गुंतवणूक ही जगात अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाची आहे. या सर्व टेक कंपन्या आहेत. महिला बचत गट किंवा इतर उद्योगात सुरू झालेल्या कंपन्यांमध्ये फारशी गुंतवणूक होताना दिसत नाही. जागतिक स्तरावर महिलांनी सुरू केलेल्या स्टार्टअपना (Startups) २०२३ मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. आणि १५ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूकही या कंपन्यांमध्ये झाली. भारतात मात्र हे प्रमाण १.१ अब्ज अमेरिकन डॉलर इतकं आहे. त्यामुळे भारतात स्टार्टअप क्षेत्रात लिंगभेद होत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Startups For Women)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.