राज्यात पुन्हा बीए व्हेरिएटंचे ३६ रुग्ण

150

शनिवारी राज्यात पुन्हा बीए व्हेरिएंटचे नवे ३६ रुग्ण आढळले. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी)च्या अहवालातून राज्यात बीए ५ व्हेरिएंटचे ४ तर बीए २.७५चे ३२ रुग्ण सापडले. यापैकी नागपूर येथे बीए व्हेरिएंटचे २३, यवतमाळ जिल्ह्यात ११ तर वाशिम येथे २ बीए व्हेरिएंटचे रुग्ण सापडले.

( हेही वाचा : सलग चौथा सॅटेलाईट टेगिंग फ्लेमिंगो पक्षी गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर शास्त्रज्ञांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय)

बीए व्हेरिएंटच्या रुग्णांसह राज्यात नव्या रुग्णांच्या यादीत १ हजार ९९७ रुग्णांची भर पडली. तर गेल्या २४ तासांत २ हजार ४७० रुग्णांना कोरोनाच्या यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आता राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.९९ टक्क्यांवर नोंदवले गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात आता १३ हजार १८६ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहे.

६ रुग्णांचा मृत्यू –

  • मुंबई, पनवेल, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यात दोन रुग्णांनी आपले प्राण गमावले.
  • राज्यात आतापर्यंत बीए ४ आणि ५ व्हेरिएंटचे १९६ रुग्ण आढळले आहेत तर बीए २.७५ व्हेरिएंटचे १२० रुग्ण सापडले आहेत.

जिल्हानिहाय बीए व्हेरिएंट ४ आणि ५च्या रुग्णांची संख्या

पुणे – १०१, मुंबई -५१, ठाणे – १६, रायगड ७, सांगली – ५, नागपूर – ८, पालघर – ४, कोल्हापूर – २

जिल्हानिहाय बीए व्हेरिएंट २.७५ च्या रुग्णांची संख्या

पुणे – ५६, नागपूर – ३३, यवतमाळ – १२, मुंबई – ५, अकोला – ४, ठाणे – ३, वाशिम २ तसेच अमरावती, बुलडाणा, जालना, लातूर, सांगली या जिल्ह्यांत प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.