State Bank Jobs : स्टेट बँक करणार १५,००० जणांची नोकरभरती

State Bank Jobs : स्टेट बँकेतील ८० टक्के नोकऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील असतील. 

218
State Bank Jobs : स्टेट बँक करणार १५,००० जणांची नोकरभरती
  • ऋजुता लुकतुके

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ही देशातील सगळ्यात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एकूण १५,००० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. यातील १२,००० लोक तरुण आणि अननुभवी असतील. तर एकूण उपलब्ध नोकऱ्यांपैकी ८५ टक्के जागा या तंत्रज्जान क्षेत्रात असतील. या कर्मचाऱ्यांना बँकेकडून प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्यानंतर विविध शाखा आणि विभागांमध्ये त्यांना सामावून घेतलं जाईल. (State Bank Jobs)

देशातील बँका अधिकाधिक आधुनिकीकरणाकडे वळत आहेत. जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाईन करण्याकडे बँकांचा कल आहे आणि त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत लागणार आहे. त्याचवेळी काही बँका तंत्रज्ञान वापरातील सुरक्षा आणि गोपनीयता या समस्यांशी झगडत आहेत. अशावेळी स्टेट बँकेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकऱ्यांचं प्रमाण अलीकडे कमी झालं आहे. देशातील काही टेक कंपन्यांनी नोकर कपातही लागू केली आहे. (State Bank Jobs)

(हेही वाचा – Novak Djokovic : रोम ओपन स्पर्धेत नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का)

अशावेळी बँकिंग क्षेत्रात लोकांना नवीन संधी उपलब्ध होत आहे. अलीकडेच मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँकेनं बँकांना तंत्रज्ञान आणि ग्राहक सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. यंत्रणा अद्ययावत करण्याबरोबरच तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि त्यातील सुरक्षितता याला प्राधान्य द्यावं असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश आहेत आणि असं न करणाऱ्या बँकांवर मध्यवर्ती बँकेनं कारवाईही केली आहे. कोटक महिंद्रा बँक हे त्याचं ताजं उदाहरण आहे. त्यामुळे बँकांनीही तंत्रज्ञानावर भर देण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. (State Bank Jobs)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.