घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रक्तपेढीत २०० लीटर रक्त वाया गेल्याच्या प्रकरणाची दखल राज्य आरोग्य विभागाने घेतली आहे. आरोग्य विभागाच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेने पालिकेच्या मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिका-यांना नोटीस पाठवली आहे. रक्ताचा अपव्यय झाल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
( हेही वाचा : मनसे झाली जागी… मनसैनिक आता रुग्णालयातम्हणणार मी हिंदवी रक्षक)
माहिती अधिकार कार्यकर्ता चेतन कोठारी यांनी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे राजावाडीत २०० लीटर रक्त वाया जात असल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिका-यांनी चौकशी करण्यात यावी, असे निर्देश राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या सहसंचालक डॉ. अरुण थोरात यांनी दिली. रक्तपेढीत संकलित केलेल्या रक्ताची चाचणी वेळेत होत नाही व रक्तकेंद्र तंत्रज्ञांच्या जागाही रिक्त असल्याने रक्ताची चाचणी होत नाही, असा आक्षेप राज्य रक्त संक्रमण परिषदेने नोंदवला. २०१९ सालापासून ६ रक्तकेंद्र तंत्रज्ञांच्या जागा रिक्त असल्याप्रकरणीही राज्य रक्त संक्रमण परिषदेने आक्षेप नोंदवला. यासह राज्य रक्त संक्रमण परिषदेने अन्न व औषध प्रशासनानेही तपास करावा, अशा सूचना दिल्या आहेत
Join Our WhatsApp Community