मागील अनेक महिन्यांपासून MPSC ला कुणी वाली नव्हता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावरून किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. अखेर राज्य सरकारने या पदावर नियुक्ती केली आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रजनीश सेठ हे राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्त झाले होते. आता त्यांच्याकडे ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. MPSC अध्यक्षांचे पद रिक्त झाल्यानंतर राज्य सरकारने या पदावर नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु केली होती, त्यासाठी अर्ज मागवले होते. त्यानुसार रजनीश सेठ यांनीही अर्ज केला होता.
तीन जणांच्या नावांची केलेली निवड
मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अर्जाची छाननी केली. त्यातील तीन नावांची निवड करून ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती यामध्ये रजनीश सेठ यांच्यासह एसटी महामंडळाचे संचालक शेखर चन्ने आणि निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश होता. यामध्ये सेठ यांचे नाव आघाडीवर होते. राजे-निंबाळकर त्यांच्या कार्यकाळात MPSC आयोगाने २०२१ मध्ये ५ हजार ४७ जागांसाठी जाहिरात काढली होती, २०२२ मध्ये ६,५७६, २०२३ मध्ये १० हजार ५२९ जागांसाठी जाहिरात दिली होती.
(हेही वाचा Google Chromebook : गूगल भारतात क्रोमबुक बनवणार, आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडून कौतुक )
Join Our WhatsApp Community