रविवारी ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णसंख्येत घट कायम दिसून येत असताना राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्याही खाली सरकल्याचे दिसून आले. मात्र ओमायक्रॉन सलग चौथ्या दिवशीही तब्बल चार जिल्ह्यांत आढळून आला. मुंबई, पुणे शहर, पुणे ग्रामीण यांसह गडचिरोलीतही ओमायक्रॉनचे नवे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५४ टक्क्यांवर
रविवारी २१८ नव्या ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या नोंदीमुळे चार दिवसांत राज्यभरात एकूण ६५२ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात केवळ ३ हजार ५०२ नवे कोरोनाचे रुग्ण रविवारी आढळून आले. तर डिस्चार्ज रुग्णांची संख्या ९ हजार ८१५ पर्यंत दिसून आली. राज्यात आता केवळ ४५ हजार ९०५ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५४ टक्क्यांवर नोंदवले गेले. रविवारी आढळून आलेल्या २१८ नव्या ओमायक्रॉन रुग्णांपैकी २०१ रुग्णांचा अहवाल भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था तर १७ रुग्णांचा अहवाल राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने दिला.
(हेही वाचा ‘या’ देशांत व्हॅलेंटाईन डे साजरा होत नाही! ‘रोमन कॅथलिक चर्च’नेही व्हॅलेंटाईनचे नाव यादीतून वगळले)
२१८ ओमायक्रॉन रुग्णांची जिल्हानिहाय नोंद
- मुंबई – १७२
- पुणे मनपा – ३०
- गडचिरोली – १२
- पुणे ग्रामीण – ४