राज्यातील सरकारी कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपामध्ये सर्व सरकारी कार्यालये, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षक,शिक्षकेत्तर, निमसरकारी आणि कंत्राटी आदी सर्व संवर्गातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष मारुती शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली.
( हेही वाचा : “…आणि शेजारी वाघाचे कातडे पांघरुन निपचित बसलेले म्यांव देखील नाही करत?”; भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल )
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व विविध शासकीय कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्यावतीने हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांना निवेदन देण्यात आले.
या प्रमुख मागण्यांसाठी संपावर
जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, रिक्त पदे भरावीत या व अन्य मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी येत्या १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.