‘FY’ ला ऍडमिशन घेताय? मतदार नोंदणी केलीत ना?

127

राज्यात 18 ते 19 वयोगटातील 10 टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे विद्यापीठातील प्रथम वर्ष प्रवेशाच्यावेळी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यासाठी येत्या काही दिवसांत राज्यातील विद्यापीठांना त्यांच्या परिनियमांत आवश्यक बदल करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यातील एकूण मतदार संख्येपैकी, 18 ते 19 वयोगटातील नोंदणीकृत मतदारांची संख्या केवळ 0.34 टक्के आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये मतदानाच्या हक्कांविषयी जागृती होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व कुलगुरुंच्या संयुक्त बैठकीत यासाठी आवश्यक ती पावले घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

( हेही वाचा: नागपूर पोलिसांना आता भटक्या श्वानांवर नजर ठेवून करावी लागणार गणना )

प्रवेशाच्यावेळी मतदार ओळखपत्र हे महत्त्वाचे कागदपत्र

त्यामुळे विद्यापीठातील परिनियमांत आवश्यक ते बदल करुन प्रवेशाच्यावेळी मतदार ओळखपत्र हे महत्त्वाचे कागदपत्र म्हणून सादर करता येईल, असा विचार सुरु असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. शिवाय मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडूनही त्यांच्या कर्माचा-यांना पाठवून मदत करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.