Covid -19 : कोविड उपाययोजनांसाठी राज्यात ‘टास्क फोर्स’ची स्थापना ;आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

180
Covid -19 : कोविड उपाययोजनांसाठी राज्यात 'टास्क फोर्स'ची स्थापना ;आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती
Covid -19 : कोविड उपाययोजनांसाठी राज्यात 'टास्क फोर्स'ची स्थापना ;आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. कोविड- 19 च्या (Covid-19) पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी 13 एप्रिल 2020 रोजीच्या निर्णयान्वये टास्क फोर्स स्थापन करण्यात आला होता. त्यानंतर आता. राज्यात पुन्हा एकदा कोविड-19 ची रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच कोरोना विषाणूचा जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. (Covid -19)

टास्क फोर्स करणार काय?
गंभीर आणि अतिगंभीर आजारी कोविड-19 रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे, कोविड-19 क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे, गंभीरपणे आजारी कोविड-19 रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे आदी कार्यवाही हा टास्क फोर्स करणार आहे. (Covid -19 )

(हेही वाचा : Ayodhya Shri Ram Mandir : अवघ्या देशाला रामलल्लाच्या दर्शनाची प्रतीक्षा; डाव्यांना मात्र वावडे )

राज्य सरकारच्या टास्क फोर्समध्ये कोण?
या टास्क फोर्समध्ये अध्यक्षस्थानी आयसीएमआर, दिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानीटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक आणि बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील (फिजिशियन) डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. (Covid -19)

JN -1 चा एकही रुग्ण मुंबईत नाही.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मंगळवार, 26 डिसेंबर रोजी मुंबईत नव्याने 19 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत 26 डिसेंबरपर्यंत घडीला 88 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, JN -1 या नव्या सबव्हेरियंटचा एकही रुग्ण मुंबईत नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.