राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यंदापासून प्रथमच राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमाची घोषणा केली. (Ashish Shelar)
(हेही वाचा- कॉल येताच वाटते भीती; Gen Z किड्समध्ये वाढतोय ‘टेलिफोनोफोबिया’; नेमकं प्रकरण आहे तरी काय?)
तिन्ही फेऱ्यांत होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील ३६ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. तालीम फेरीतून निवड झालेल्या संघांना एकांकिका सादरीकरणासाठी १०,००० रुपयांचा नाट्यनिर्मिती खर्च देण्यात येणार आहे. त्यानंतर सहा महसूली विभागांच्या मुख्यालयांवर प्राथमिक फेरी आणि मुंबईत अंतिम फेरी होणार आहे. अंतिम विजेत्यांना १ लाख, ७५ हजार, आणि ५० हजार रुपयांची बक्षीसे दिली जातील. उत्कृष्ट बोलीभाषा, दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, अभिनय यांसारख्या विविध श्रेणीतही विशेष पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. (Ashish Shelar)
आशिष शेलार म्हणाले की, “राज्यातील तरुण कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.” स्पर्धेचे नियोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत केले जाईल, तसेच लवकरच तारखा जाहीर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. (Ashish Shelar)
(हेही वाचा- महापालिका रुग्णालयातील Zero Prescription Policy हवेतच विरली; रुग्णालयांची औषध खरेदी छाननी आणि निविदेतच अडकली)
राज्य सरकारचा हा निर्णय तरुण कलाकारांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Ashish Shelar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community