POP Ganesha idols : पीओपी गणेशमूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

32
POP Ganesha idols : पीओपी गणेशमूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार
POP Ganesha idols : पीओपी गणेशमूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती (POP Ganesha idols) विसर्जनावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. महापालिका (BMC) प्रशासनाने प्रदूषण टाळण्यासाठी पीओपी गणेशमूर्तींच विसर्जन (Immersion) करू न देण्याची भूमिका घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. दरम्यान या प्रकरणात राज्य सरकार (State government) आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाणार आहे. (POP Ganesha idols)

हेही वाचा-राम मंदिराचे मुख्य पुजारी Acharya Satyendra Das यांचे निधन

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्यासह काही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यापुढे नाराजी व्यक्त केली होती. प्रदूषण टाळण्यासाठी पीओपी गणेशमूर्तींचे (POP Ganesha idols) विसर्जन करू न देण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने माघी गणेशोत्सवात घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. हा मुद्दा मुख्यमंत्र्यांपुढे उपस्थित करण्यात आला. (POP Ganesha idols)

हेही वाचा-तुम्ही नगरसेवक असताना किती बेकायदा बांधकामांवर कारवाई केली ? ठाकरे गटाच्या नगरसेवकाला High Court ने सुनावले

मशिदीवरील भोंगे काढण्याच्या आदेशाची पोलीस व अधिकारी अंमलबजावणी करीत नाहीत. मात्र मूर्तींवरील (POP Ganesha idols) बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचे मंत्र्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात निर्माण होणारा संभाव्य पेच लक्षात घेऊन तातडीने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (POP Ganesha idols)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.