APMC : राज्यातील बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद पुण्यात

38
APMC : राज्यातील बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद पुण्यात
APMC : राज्यातील बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद पुण्यात

राज्यातील बाजार समित्यांच्या (APMC) कामकाजात सुधारणा आणि आधुनिकरणासाठी सोमवारी पुण्यात राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने बाणेर येथील बंटारा भवन येथे पार पडणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते तिचे उद्घाटन होईल.

पणन मंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी या परिषदेबाबत माहिती देताना सांगितले की, राज्यातील सर्व बाजार समित्यांचे (APMC) सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव या परिषदेत सहभागी होणार आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, (Manikrao Kokate) सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे (Pravin Darade) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

(हेही वाचा – Train Accident साठी ट्रॅकवर ठेवला खांब; केरळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघांना अटक)

बाजार समित्यांच्या आधुनिकीकरणावर भर

राज्यात 305 बाजार समित्या (APMC) आणि 623 उपबाजार कार्यरत असून, गेल्या 40 वर्षांपासून त्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. मात्र, बदलत्या काळानुसार बाजार समित्यांच्या आधुनिकीकरणावर भर देण्याची गरज असल्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेत शेतमालाच्या विपणनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी, बाजार समित्यांचे (APMC) उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना आणि दैनंदिन अडचणींवर चर्चा होणार आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar : विल्सन महाविद्यालयातील विद्यार्थी सावरकर स्मारकातील लाईट अॅण्ड साऊंड शो पाहून झाले प्रभावित)

कृषी पणन व्यवस्थेत सुधारणा

राज्यात कृषी पणन व्यवस्थेत सुसूत्रता आणि समन्वय आणण्यासाठी विविध प्रकल्प आणि योजना राबवण्यात येत आहेत. कृषी पणन मंडळाच्या वतीने बाजार समित्यांच्या (APMC) पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येते.

या परिषदेच्या माध्यमातून राज्यातील बाजार समित्यांना (APMC) सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम (Sanjay Kadam) यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.