कुसुमाग्रज जयंती, मराठी भाषा दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचं आयोजन

264

दरवर्षी कवी कुसुमाग्रज यांची जयंती व मराठी भाषा दिन दि. 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून यावर्षी उरण तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र व रायगड जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन स्पर्धेसाठी निबंध मराठी भाषेतच लिहिणे आवश्यक आहे. निबंध कागदावर सुवाच्छ, स्वच्छ सुंदर अक्षरात लिहून [email protected] या ई-मेलवर पाठवावा.

( हेही वाचा : ‘शून्य प्लास्टिकचा प्रारंभ माझ्यापासून’ म्हणत, तब्बल 1,281 किलो प्लास्टिक केले गोळा! )

निबंधाच्या शेवटी निबंध लिहिणाऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, इयत्ता, वय, संपर्क क्रमांक लिहावा. निबंध पाठविण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.

पहिला गट- इयत्ता 5 वी ते 7 वी

  • विषय -माझी आवडती भाषा मराठी , शब्द मर्यादा 500

दुसरा गट – इयत्ता 8 वी ते 10 वी

  • विषय -मातृभाषेचे महत्व , शब्द मर्यादा 800

तिसरा गट – 11 वी ते 12 वी

  • विषय -27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन, शब्द मर्यादा 1000

चौथा गट – महाविद्यालयीन प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष (पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी),

  • विषय – मराठी भाषेच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी विविध उपाययोजना, शब्द मर्यादा 1200

पाचवा गट – खुला गट (कोणतेही स्त्री पुरुष),

  • विषय – मराठी भाषेचे वर्तमान आणि भविष्य, शब्द मर्यादा -1500

सर्वोत्कृष्ट निबंधासाठी 1 ते 3 क्रमांक प्राप्त झालेल्या विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येईल.

नाव नोंदणी व अधिक माहिती संपर्क

या स्पर्धेसाठी नाव नोंदणी व अधिक माहितीकरिता श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील (संपर्क क्र. 7208631009), कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे (संपर्क क्र. – 9702751098) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.